Home Breaking News बस चालकावर हल्ला, लाकडी काठीने मारहाण

बस चालकावर हल्ला, लाकडी काठीने मारहाण

● शासकीय कामात अडथळा, विरकुंड–बोर्डा मार्गावरील घटना

C1 20250926 17511274

शासकीय कामात अडथळा, विरकुंड–बोर्डा मार्गावरील घटना

Wani News :
शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बोर्डा या गावाकडे महामंडळाची बस जात होती. सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास दुचकीस्वाराने बस चालकासोबत हुज्जत घातली. काठीने जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबरला घडला. याप्रकरणी तक्रारीअंती पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.Bus driver attacked, beaten with wooden stick

सरकारी सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महामंडळाच्या चालकावर दुचाकीस्वाराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास विरकुंड–बोर्डा मार्गावर समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH 29 BW 8150 च्या दुचकीस्वाराने वणी आगारातील बस क्रमांक MH 40 AQ 6062 चा मार्ग अडवला. चालकाला उद्देशून “फुकटची नौकरी लागली आहे” अशा अपमानजनक शब्दांत शिवीगाळ करून बस चालकाची कॉलर पकडली व बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी वाहक संजय नान्ने धावून आले मात्र, संतप्त मोटरसायकल चालक पायघन रा. बोर्डा याने लाकडी काठीने बस चालकाच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणणारी ही गंभीर घटना असून, तक्रारदार चालक सुनिल मोतीराम नैताम (50) रा. वागदरा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Img 20250103 Wa0009

या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध BNS कलम 132, 121(1), 352 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास एपीआय निलेश अपसुंदे हे करीत आहेत.
ROKHTHOK