● प्रभागातील प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणले
वणी | नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2(ब) मध्ये तगडे आव्हान उभे करत माजी नगरसेवक राजू तुराणकर पालिका रणसंग्रामाच्या शर्यतीत आघाडी घेत असल्याची चर्चा प्रभागात जोमाने रंगली आहे. कामगिरीचा दांडगा अनुभव, नागरिकांच्या सुखदुःखात धावपळ आणि लढवय्या स्वभाव याच्या बळावर त्यांची दावेदारी अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे. Raju Turankar’s race to victory
जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून, प्रशासनाशी लढणारे राजू तुराणकर हे जनतेचे हक्काचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. “काम न करणाऱ्या “भोंगळ” कारभाऱ्यांच्या जाळ्यात पुन्हा अडकायचं नाही” अशी भावना मतदारांमध्ये दिसत असून, कार्यतत्पर नेतृत्व म्हणून तुराणकरांची मागणी जोर धरत आहे. कोव्हिड च्या काळात त्यांनी केलेली जनहितार्थ कामे अविस्मरणीय आहे.
प्रभागात सध्या राजू तुराणकरांचा प्रचार झंझावाती वेगाने सुरू आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन ते देत आहेत. मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिस्पर्ध्यांचे गणित पूर्णपणे बिघडल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
न्यायाच्या लढ्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत… पण ते कधीच मागे हटले नाहीत! समाजकारण त्यांच्या नसानसात भिनलेले असून अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे ते धडाडीचे नेते आहेत. अन्यायाला टक्कर देणारा धडाडीचा कार्यकर्ता म्हणजे राजू तुराणकर अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
नगर पालिका कामकाजाचा अनुभव, प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याची जिद्द आणि लोकांसाठी दांडगी तळमळ या बळावर प्रभाग 2(ब) मधील नागरिकांना एक मजबूत, तडफदार व काम करणारा लोकप्रतिनिधी मिळणार, अशी चर्चा आता जोरदार रंगली आहे.
Rokhthok






