● लोकाभिमुख, पारदर्शक व स्थिर सुशासन
● मतदार राजांनी सजग व दक्ष असावे
वणी | शहराचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधायचा असेल, तर केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकाच पक्षाचे शासन असणे आवश्यक आहे, असा दावा भाजपचे वणी शहराध्यक्ष ऍड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी केला आहे. ‘पार्लमेंट ते पंचायत एकच विचाराचं शासन म्हणजे विकासाचा वेग’ या अभियानाअंतर्गत त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले. Development First: BJP’s “agenda” is a developed city
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर शासन असल्याने देशभरात विकासकामांचा वेग वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला. महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन यांसारख्या योजनांमुळे देशाचा कायापालट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात भाजप-महायुती सत्ता असल्याने सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती मिळाली आहे, असेही चौधरी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगतीचा वेग आणखी वाढल्याचा दावा त्यांनी केला.
वणी शहरातील विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. केंद्र-राज्याच्या धोरणांना अनुरूप दिशा मिळाल्यानेच शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
नगरपालिकेत सर्व प्रभागांमध्ये एकसंघ राजकीय नेतृत्व नसल्याने काही कामांना विलंब होतो, असे सांगत “वणीचा खरा विकास करायचा असेल तर नगराध्यक्षापासून नगरसेवकांपर्यंत एकच पक्ष असणे आवश्यक” असल्याने मंजुरी प्रक्रियेला गती, निधीचा सुरळीत पुरवठा, शहराचा चेहरा पालटण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्थिर आणि मजबूत सत्तेमुळे कोणतीही तांत्रिक किंवा राजकीय अडचण येत नाही, विकासाचं चक्र गतिमान पद्धतीने फिरू लागते. पायाभूत सुविधांचे विक्रम, डिजिटल क्रांती, अंतर्गत रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अशा असंख्य योजना सहज राबवता येते याकरिता वणी नगर पालिकेत एकहाती सत्ता स्थापनेसाठी मतदार राजांनी सजग व दक्ष असावे असे मत व्यक्त केले.
Rokhthok






