Home Breaking News थरारक…स्कॉर्पिओ व अँपेची जोरदार धडक

थरारक…स्कॉर्पिओ व अँपेची जोरदार धडक

● पाच जण जखमी, तिघांना उपचारार्थ यवतमाळला हलवले

C1 20251204

पाच जण जखमी, तिघांना उपचारार्थ यवतमाळला हलवले

मारेगाव | हिवरा मजरा शिवारात कमलाकर डोंगरे यांच्या शेताजवळ बुधवार दिनांक 3 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता भरधाव स्कॉर्पिओ ने प्रवासी वाहतूक करणाऱ्या अँपे वाहनाला जबर धडक दिली. यात पाच जण जखमी झाले. तिघांना गंभीर मार लागला तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. Scorpio-Ampe hit by a strong current: Five people injured

तक्रारदार विनोद रामचंद्र काळे (57) रा. हिवरा मजरा हे MH 29 5134 क्रमांकाच्या अँपेने सहा प्रवासी घेऊन मार्डी आठवडी बाजाराकडे निघाले होते. दरम्यान समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने भरधाव व बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने ही घटना घडल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

या अपघातात प्रवासी सुभाष नामेदेव मोरे (55), मारोती वंसता ढरे (35), प्रतीक्षा थराजी बेले (16) या तिघांच्या पायाला गंभीर मार लागला तर शुभम मारोती ढरे (35), माणीक नारायण तारके (55) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व प्रवासी काळी दौलत खान, ता. महागाव येथील असल्याचे समजते.

Img 20250103 Wa0009

जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने वणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात कलम 281, 125 (A), BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके आणि पो.का. सागर दिपेवार करीत आहेत.
Rokhthok

Previous articleशिक्षक गजेंद्र काकडे यांना पितृशोक
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.