● नवनिर्वाचित सदस्यांची पक्षाकडे लॉबिंग
Political News:
वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवत सत्तेवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. 29 पैकी तब्बल 18 जागा जिंकत भाजपने स्पष्ट व निर्णायक विजय नोंदवला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्या सचिन आत्राम यांनी साडेचार हजारांहून अधिक मताधिक्य मिळवले. तर भाजपने आपली लोकप्रियता अधोरेखित केली. आता उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते याकडे वणीकरांचे “लक्ष्य” लागले आहे. Newly elected members lobbying the party
सत्तास्थापनेपूर्वीच अपक्ष उमेदवार अब्दूल हाफिज (टापू) यांनी भाजपला खुला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे. भविष्यात अनेक घडामोडी घडणार आहे. सत्तेचा स्वाद चाखण्यासाठी आणखी कोण- कोण खुला किंवा छुपा पाठिंबा दर्शवतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, उपाध्यक्ष पदाबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपाध्यक्षपदासाठी “परिवारातून” नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्याचबरोबर राजकीय व जातीय समीकरणांचा विचार करूनच उपाध्यक्षांची निवड केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निवडणुकीत मतदारांनी विकासाला प्राधान्य देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रभावी रणनीती राबवत निवडणूक जिंकली, किंबहुना विरोधकांवर बाजी मारली. वणी नगरपालिकेत आता भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Rokhthok






