● तीन दिवसांपासून होते बेपत्ता
रोखठोक | पत्रकार तसेच वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे दि 18 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. त्यांचे पंचायत समिती परिसरातील अतिक्रमित झेरॉक्स सेंटर प्रशासनाने अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आले होते. यामुळे ते व्यथित झाले होते तसेच ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात केली होती. भोयर हे सोमवारी गुरुकुंज मोझरीत आढळले आहेत.

दिलीप भोयर हे आपल्या गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांसह पंढरपूरला गेले होते. धनबाद रेल्वे ने वणीला परतण्याचा दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेत त्यांचे दुकान काढण्यात आले. यामुळे ते व्यथित झाले होते. तसेच फेसबुकवर “भावांनो मी खचलो, मला माफ करा…ही माझी शेवटची पोस्ट आहे असे भावनाविवश वाक्य व्हायरल केल्याने खळबळ माजली होती.
पंढरपूर येथून परतताना कार्यकर्त्यांना न सांगता भोयर नांदेड रेल्वे स्थानकावर नास्ता आणायला जातो म्हणून उतरले होते तर रेल्वेत चढलेच नाहीत. ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या पत्नी सुकेशनी भोयर यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. तशीच त्यांची शोधाशोध करण्यात येत असतानाच सोमवारी ते गुरुकुंज मोझरीत आढळले.
गुरुदेव तुकडोजी महाराज यांच्यावर श्रध्दा असलेले रवींद्र मानव यांना गुरुकुंज मोझरीत दिलीप भोयर दिसले. त्यांनी भोयर यांची समजूत काढली व वणी येथे घेवून येत असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले. तत्पुर्वी आज वंचित बहुजन आघाडीने SDO यांना निवेदन देत तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती.
वणी: बातमीदार