Home Breaking News अखेर…वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल

अखेर…वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल

1020

संगनमताने अपहार करणे भोवले

रोखठोक | कोरोना काळात मोठया प्रमाणावर शासनाने वैद्यकीयसेवे करीता निधीची उपलब्‍धता करुन दिली होती. माञ या निधीचा गैरवापर झाल्‍याचे आता निदर्शनांस येत आहे. येथील कोवीड सेंटरमध्‍ये रकमेचा अपहार झाल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न्‍यायालयात धाव घेतली होती. न्‍यायालयाने सदर प्रकरणात चौकशी करुन वैद्यकीय अधिक्षकांसह पाच जणांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचे आदेश दिले. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हे नोंद केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Img 20250422 wa0027

वणी येथील शासकीय रुग्‍णांलयात कोवीड सेंटर सुरु करण्‍यात आले होते. तसेच रुग्‍णांना उपचारार्थ हलविण्‍या करीता रुग्‍णवाहिकेची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. परिसरात असलेल्‍या एसीसी सिमेंट कंपनीने ग्रामीण रुग्‍णांलयाला चालक कन्‍हैया उर्फ करण विठठल गेडाम याचेसह रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करुन दिली होती.

Img 20250103 Wa0009

एप्रिल 2021 मध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे ग्रामीण रुग्‍णालयातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीमध्ये दिनांक 10 एप्रील 2021 पासून कोविड सेंटर सुरू करण्यांत आले. याठिकाणी करण गेडाम यांना कंञाटी पध्‍दतीने ऑक्‍सीजन ऑपरेटर म्हणून नियुक्‍त करण्‍यात आले होते.

करण गेडाम याची चालक म्‍हणुन 12 तास तर ऑक्‍सीजन ऑपरेटर म्‍हणुन 16 तास असे एकुन दिवसाला 28 तास काम करत असल्‍याचे तक्रारकर्ता कांबळे यांचे निदर्शनांस आले. याबाबत कांबळे यांनी संपुर्ण माहिती करुन कागदपञे गोळा केली. यावरुन एकाच इसमाला एसीसी सिमेंट कंपनी व कोविड सेंटर या दोन्ही ठिकाणावरुन वेतन मिळत असल्‍याचे दिसून आले.

शासकीय रकमेचा अपहार होत असल्‍याने कांबळे यांनी थेट न्‍यायालयात धाव घेतली. न्‍यायलयाने चालक कन्‍हैया उर्फ करण विठठल गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर पोहे, अधिपरिचारीका जयश्री इंगोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार व लिपीक सतिश जोगी यांचेवर संगणमताने अपहार केल्‍याचा ठपका ठेवत गुन्‍हे नोंद करुन तपास करण्‍याचे आदेश दिले होते.

या प्रकरणी वणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांवर दि 20 डिसेंबरला गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून एवढया मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची किंबहुना ही पहिलीच घटना असावी. न्‍यायालयाच्‍या या आदेशाने शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्यांवर वचक बसणार आहे. तक्रारकर्त्‍या तर्फे ऍड. डी.एस.भगत यांनी काम पाहिले.
वणी : बातमीदार