Home Breaking News अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने माजली ‘खळबळ’

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने माजली ‘खळबळ’

मारेगाव तालुक्यातील घटना

वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी वरून अर्जुनी कडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली असून ही घटना रविवार दि. 10 जुलै ला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्ष असावे असा कयास वर्तवण्यात येत आहे. अर्जुनी गावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर त्या परिसरातील गुराखी आपली जनावरं चारत असताना त्याला मृतदेह दिसला. त्याने या बाबत शेत शिवारातील लोकांना सांगितले तसेच प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सूचित केले.

ठाणेदार राजेश पुरी यांनी घटनेचे गांभीर्य बघता तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले. मृतक हा गुलाबी रंगांचे शर्ट व राखडी रंगाची पॅन्ट परिधान करून आहे. तर अंगात लाल रंगाची बनियन घातलेली आहे.

Img 20250103 Wa0009

पोलीस प्रशासनाने तपासाचे चक्र वेगाने फिरवले असून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच परिस्थितीजन्य आकलन आणि उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच आत्महत्या, घातपात याची खातरजमा होणार आहे. तूर्तास त्याचा मृत्यू कशाने झाला याचे कोडे संभ्रम निर्माण करणारा असल्याने तर्क वितर्क लढवल्या जात आहे

वणी: बातमीदार