Home Breaking News अनर्थ टळला, विद्यार्थी अपघातातून बचावले

अनर्थ टळला, विद्यार्थी अपघातातून बचावले

● चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेतून परत घरी नेत असताना स्कूल बस ला अपघात झाला आणि.....

7230

बसवरील नियंत्रण सुटल्याने घडला थरार

Accident News | चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेतून परत घरी नेत असताना स्कूल बस ला अपघात झाला. सुदैवानं बसमधील 35 ते 40 विद्यार्थी सुखरूप आहेत. तालुक्यातील सूंदरनगर येथील DAV या इंग्रजी शाळेची स्कुलबस दुपारी 3 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या खाली उतरली. जर विजेच्या खांबाचा टेकू मिळाला नसता तर विपरीत घडले असते.A school bus carrying young students back home from school met with an accident.

Img 20250422 wa0027

सुंदरनगर येथील DAV या इंग्रजी शाळेची बस क्र MH- 39 – FC- 6358 ही विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन येत असताना ही भयावह घटना घडली. भालर ते सुंदरनगर हा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.

Img 20250103 Wa0009

तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. वाहन चालवताना चालकाला कवायती कराव्या लागत आहे. संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने काही वर्षपूर्वी निष्पाप चिमुकल्यांना जीव गमवावा लागला होता. ती जखम अद्याप भरलेली नाही.

शाळा प्रशासनाने विशेषत्वाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर शाळा समिती, प्रादेशिक परिवहन विभाग व संबंधित विभागाने चिमुकल्यांच्या जीवाशी खेळू नये. घडलेला प्रकार गंभीर असल्याने त्या सर्वांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे.
Rokhthok News