Home Breaking News अपघातात वृद्धेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातात वृद्धेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

● नायगाव जवळ घडली घटना

C1 20241117 10161656

नायगाव जवळ घडली घटना

Sad News : शनिवारी सायंकाळी वरोरा मार्गावरील नायगाव शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने 65 वर्षीय महिलेला जबर धडक दिली. या अपघातात वृद्धेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. The old woman died on the spot in the accident

ताराबाई लाटारी जोगी (65) राहणार नेरड पुरड येथील महिला असून ती रोजमजुरी करते. नायगाव शिवारात शेतीचे काम आटोपून बऱ्याच महिला ऑटो ने महामार्गावरील नायगाव फाट्यावर उतरल्या. सोबत असलेल्या महिलांनी रस्ता क्रॉस केला. शेवटी ताराबाई रस्ता पार करत असताना भरधाव वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली, प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009