Home Breaking News अरेच्चा… क्रिकेट सट्टयाची व्याप्ती वाढली, 18 सटोडीयासह त्या.. म्होरक्यावर कारवाई

अरेच्चा… क्रिकेट सट्टयाची व्याप्ती वाढली, 18 सटोडीयासह त्या.. म्होरक्यावर कारवाई

921

2 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
सायबर सेलची धडाकेबाज कारवाई

वणी: राळेगाव तालुक्यातील झाडगाव शेत शिवारात क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन(Betting) सटटा खेळत असल्याची गोपनिय माहीतीच्या आधारे धाडसत्र अवलंबण्यात आले. यावेळी दोन लाख 83 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ऑनलाईन क्रिकेट सट्टयाची शृंखला चालवणाऱ्या पांढरकवडा येथील म्होरक्या सह 16 सटोडीयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Img 20250422 wa0027

जिल्ह्यातून अवैद्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करावेत असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सर्वच ठाणेदारांना दिले आहेत. परंतु बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे अवैद्य व्यवसाय चालत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

Img 20250103 Wa0009

Mumbai Indian V/S Chennai Super Kings या IPL T-20 च्या सामन्यावर दि. 21 एप्रिल ला रात्री सट्टा खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळाली त्यांनी तात्काळ शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश सायबर सेल पथकास दिले. सपोनि अमोल पुरी व पथकांनी घटनास्थळ गाठत शिताफीने धाडसत्र अवलंबले.

झाडगाव पासुन तिन किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात रात्रीच्या अंधारात राजु पुळके यांच्या शेतातील मोकळ्या जागेत टिनाच्या शेड खाली क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळल्या जात होता. यावेळी आमीर उस्मान खान पठाण, शाहरुख उस्मान खान पठाण हे दोघे रा. शांती नगर, राळेगांव व सागर शंकरराव पाथरकर रा. राम मंदिर राळेगाव यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील आरोपीकडून एक लॅपटॉप, 12 मोबाईल संच, दोन दुचाकी वाहन रोकड असा एकूण दोन लाख 83 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच लॅपटॉप मधील उतरवाडी बाबत पोलिसांनी विस्तृत चौकशी केली असता मुख्य म्होरक्या पांढरकवडा येथील असल्याचे स्पष्ट झाले.

ताब्यातील आरोपीला पोलिसांनी विचारणा केली असता नुर जिवाणी राहणार पांढरकवडा याला उतारवाडी देत असल्याचे निष्पन्न झाल्याने क्रिकेट बेटिंग ची व्याप्ती वाढली आहे. यात परदेशीय मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी लागवड व खायवड करणाऱ्या रंजीत मोकळे, महेश तुने, नदिम, सलिम, अमोल चांदोरे, संजय राव, अन्ना डंबारे, बाबू भोयर, आकाश चिचोळकर, इल्लू ऊर्फ शिवम, संदिप तामगाडगे, वृषभ रावेरी, मंथन सोनवणे, सदराद, कैलास सिडाम यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि अमोल पुरी, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, पंकज गिरी, अजय निंबोळकर, सतिष सोनोने, प्रविन कुथे, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांनी पार पाडली.
वणी: बातमीदार