Home Breaking News अल्पवयीन बालिकेचा विनयभंग, आरोपी अटकेत

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग, आरोपी अटकेत

मारेगाव पोलिसांची कारवाई

मारेगाव: तालुक्यातील एका खेडेगावात वास्तव्यास असलेल्या दोन मैत्रिणी शिकवणीसाठी मारेगावला जात असताना 23 वर्षीय तरुणाने तिचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना गुरुवार दि. 16 जूनला घडली.

घडलेल्या घटनेने घाबरलेल्या बालिकेने घरच्या मंडळींना आपबिती सांगितली. पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्या मजनूला अटक केली आहे.

हर्षल नरेन्द्र धंदरे (23) हा मांगरूळ येथील निवासी असून तो मिस्त्रिकाम करतो. एका खेड्यातील 14 वर्षीय बालिका नेहमी शिकवणी साठी मारेगाव ला येत असल्याने तो मजनू तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. दररोज ती त्याला दिसायची यामुळे तिला भेटण्याची व भ्रमणध्वनी मिळवण्याची त्याला घाई झाली होती.

Img 20250103 Wa0009

गुरुवारी पीडित बालिका आपल्या मैत्रिणीसोबत शिकवणी करिता येत असल्याचे दिसताच विरुद्ध दिशेने घोन्सा मार्गावरील ITI जवळ त्याने तिला अडवले. तिचा हात पकडून त्याने तिला मोबाईल क्रमांक मागितला. अनपेक्षित घडलेल्या घटनेने ती बालिका प्रचंड घाबरली. तिने याबाबत पालकांना सांगितले. पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

ठाणेदार राजेश पुरी यांनी घटनेचे गांभीर्य बघताच तातडीने गुन्हा नोंद केला. मांगरूळ येथील तेवीस वर्षीय युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गोविंद सावंत करत आहे.
मारेगाव: बातमीदार