वणी: बल्लारपूर शहरातील एका कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये 16 वर्षीय बलिकेची छेडखानी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच हे कृत्य केल्याने संतापलेल्या नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना 30 ऑगस्टला सकाळच्या सुमारास घडली. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून तक्रारीअंती पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

एड.संजय बाजपेयी असे गुन्हा दाखल झालेल्या विकृताचे नाव आहे. त्याचे बाजपेयी कम्प्युटर इन्स्टिट्यूट असून तेथे विद्यार्थ्यांना MSCIT चे प्रशिक्षण दिल्या जाते. घटनेच्या दिवशी सकाळी बालिका कामानिमित्त इन्स्टिट्यूट मध्ये गेली होती.
यावेळी इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी आले नव्हते त्या क्षणाचा फायदा घेत इन्स्टिट्यूट संचालक एड. संजय बाजपेयी यांनी मुलीला वाईट दृष्टिकोणाने हात लावत, “मला तू आवडते” असे म्हणत अश्लील पध्दतीने पीडित मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने बालिका कमालीची घाबरली. तिने हा प्रकार घरच्या मंडळींना सांगितला, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. 1सप्टेंबरला कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू झाल्यावर नागरिकांनी बाजपेयींला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी पीडित बलिकेचा तक्रार नोंदवली आणि गुन्हा दाखल केला. घडलेल्या प्रकाराने राजकीय पक्षाची पत चांगलीच खालावली. पक्षाच्या वरिष्ठांनी त्याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली आहे.
वणी: बातमीदार