● सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
एरवी आमदार म्हटलं की राजकीय भाषण, मोर्चे, आंदोलने हेच आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आमदारांमध्ये देखील सुप्त गुण असतात असे वेळोवेळी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गायलेले सुरेल भजन ‘प्रतिभा’शाली उदाहरण आहे.

पेट्रोल, डिझेल, इंधन व खाद्य तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी पैशात जगणे कठीण झाले आहे. याची जन जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील गावा- गावात जाऊन जन जागरण अभियान सुरू केले आहे.
वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर ह्या देखील हे अभियान प्रभावीपणे राबवत आहे. दि 27 नोव्हेंबर ला भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावात जाऊन त्यांनी रात्री मुक्काम केला. रात्री जन जागरण करण्यासाठी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
भजन मंडळींनी भजनाला सुरवात केली आणि आमदार प्रतिभा धानोरकर भजनात बसल्या, त्यांनी आपल्या मधुर आवाजात ‘सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना’ ही गवळण सादर करून सर्वांनाच चकित केले. या भजनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
वणी: बातमीदार