Home Breaking News आणि…आमदारांनी वेकोली अधिकाऱ्यांना ‘फटकारले’

आणि…आमदारांनी वेकोली अधिकाऱ्यांना ‘फटकारले’

849

विविध समस्यांचा विळख्यात उकणी ग्रामस्थ
तात्काळ निवारण करा अन्यथा…

वणी: तिन्ही बाजूने कोळसा खाणी, त्यातून उत्खनन झालेल्या मातीचे महाकाय ढिगारे, तर चौथ्या बाजूला वर्धा नदी. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आणि जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा खणखणीत प्रश्न उपस्थित करून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वेकोली अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.

Img 20250422 wa0027

वेकोली निर्मित विविध प्रकारच्या समस्यांनी उकणी ग्रामस्थ बेजार झाले आहेत तर वेकोली प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहेत. कोळसा खाणीतील उत्खनन, दळणवळण यामुळे वाढलेले प्रदूषण मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. धूलिकण प्रदूषणाने शेतपिके बाधित होत असून उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे.

Img 20250103 Wa0009

वेकोली निर्मित मातीचे महाकाय ढिगारे भविष्यात घातक परिणाम करणारे ठरणार आहे. वर्धा नदीला पूर आला तर त्या ढिगाऱ्यामुळे पाणी उकणी गावात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे वित्त व जीवितहानी ची शक्यता ग्रामस्थ वर्तवत आहे. यामुळे उकणी गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

उकणी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन खाडे व सदस्यांनी वारंवार वेकोली अधिकाऱ्यांना वेकोली निर्मित समस्या बाबत अवगत केले. परंतु निवेदने, तक्रारींना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आ. बोदकुरवार यांनी उकणी गाव गाठले. याप्रसंगी शेतकरी नेते दिनकर पावडे सुद्धा उपस्थित होते. यावेळी वेकोली उकणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक राजेंद्र कुमार, खान प्रबंधक धनजय कुमार व सुरक्षा अधिकारी आंबेकर यांना धारेवर धरत तात्काळ समस्यांचे निवारण करण्याचा सूचना दिल्या.

वेकोली अधिकाऱ्यांनी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देत गावाच्या विकासासाठी व गावाचे पुनर्वसन करण्यासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच नरेंद्र बलकी, गणेश शिवरकर, नत्थूजी खाडे, रविंद्र धांडे, प्रविण कातरकार, उमेश रोडे, नानाजी शेंद्रे, रामदास क्षीरसगर, मधुकर बलकी, पांडुरंग बड़वाईक, नामदेव नागराळे, चिंतामन रणदिवे, अशोक दुधलकर, वसंता धांडे, हरिदास घाटे, किसन गोहोकर, बंडू खिरटकर, प्रमोद खाडे, रामदास चौधरी, मंगेश रासेकार, अंकुश खाडे, उत्तम रासेकार, कवडू पचारे, सचिन झाड़े संजय कृ. खाडे, रवि अंड्रस्कार, गणेश पारशिवे, राजू खापने, गणेश वांढरे, संदीप बलकी, दिलीप कडूकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी: बातमीदार