Home Breaking News आणि… त्याने मित्राच्या गळ्यावरच चालवला ‘चाकू’

आणि… त्याने मित्राच्या गळ्यावरच चालवला ‘चाकू’

क्षुल्लक कारणावरून घडली घटना

वणी: पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गवळी ले आउट परिसरात शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून मित्रानेच क्षुल्लक वादातून हे कृत्य केले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

देव दिलीप श्रीरामे (19) असे चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो शिवाजी वार्डात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी गांधी नगर परिसरात राहणाऱ्या नयन उर्फ नंदकिशोर माधव राठोड (20) या मित्रा सोबत तो देशमुख नगर रोडवरील गवळी ले आऊट परिसरात रात्री गप्पा मारत उभा होता.

त्या दोघांत गप्पाचा फड रंगत असतानाच काहीतरी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात बिनसले. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. देव ने आपल्या खिशातील चाकू काढला व मित्राच्या गळ्यावर चालवला आणि पसार झाला. यात नयन गंभीर जखमी झाला होता, तो धडपडत जवळच असलेल्या दुकाना जवळ पोहचला व मदतीची याचना केली.

Img 20250103 Wa0009

परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी नागपूर ला हलवले. जखमीचे तरुणाचे नातेवाईक सुदाम राणा राठोड (47) यांनी आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
वणी: बातमीदार