● गोवारी (पार्डी) गावातील घटना
वणी: रागाच्या भरात पत्नी माहेरी गेल्यामुळे व्यथित झालेल्या 30 वर्षीय मद्यपी युवकाने रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवारी (पार्डी) गावात घडली.

शंकर हुसेन किनाके (30) असे मृतकाचे नाव आहे. गोवारी (पार्डी) येथे तो वास्तव्यास होता. त्याला दारूचे व्यसन होते यामुळे तो सातत्याने घरी भांडण करायचा. रविवारी असाच तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पत्नी सोबत वाद घालून भांडण केले सतत होत असलेल्या या जाचा मुळे ती अबला घरातून निघून गेली.
पत्नी घर सोडून गेल्यामुळे व्यथित झालेल्या शंकर किनाके यांनी भावाला फोन करून आत्महत्या करतो असे म्हटले. हा नेहमीचाच फंडा असल्याने त्याने लक्ष दिले नाही आणि अनर्थ घडला.
सोमवारी सकाळी खरंच शंकर ने गळफास घेतल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शिरपूर पोलिसांना सूचित केले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
वणी: बातमीदार