Home Breaking News आणि…माकडाचा धुडगूस, 6 ते 7 जणांना घेतला चावा

आणि…माकडाचा धुडगूस, 6 ते 7 जणांना घेतला चावा

रवी नगरातील घटना, नागरिक हैराण

वणी: शहरातील रवी नगर परिसरात एका माकडाने चांगलाच धुडगूस घातला आहे. बुधवार दि. 25 मे ला डीपी रोड लगत असलेल्या एका घरात त्याने ठाण मांडून तब्बल 6 ते 7 जणांना चावा घेतल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

रवी नगर परिसरात कळपातून वेगळा झालेलं माकड चांगलंच तापलेलं आहे. त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था अग्रसेंन भवनातील लग्नसमारंभातून होत असली तरी त्याने डीपी रोड लगत असलेल्या लखमापुरे यांच्या घरातील कुलर खाली त्याने ठिय्या दिलेला आहे.

उष्णतेचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे. वन्यजीव सिमेंटच्या जंगलात आपली भूक-तहान भागविण्यासाठी येत आहे. अशातच माकडाची टोळी रवी नगर परिसरात आली असावी त्यातील एक माकड येथे भरकटला. त्या माकडाने निवारा शोधला मात्र त्याला हाकण्याचा प्रयत्न केला की तो चावा घेत असल्याने आजूबाजूचे नागरिक धास्तावले आहेत.

Img 20250103 Wa0009

परिसरातील लहान मुलांना तसेच नागरिकांना ‘तो’ चावा घेत असल्याने वन विभागाकडे तक्रार करण्यात आली. वन विभागाचे काही कर्मचारी लखमापुरे यांच्या घरी आले, त्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा तो अग्रसेन भवन कडे पळाला. काही वेळाने तो पुन्हा तेथेच परतल्यामुळे त्या माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
वणी: बातमीदार