● सहनशक्ती संपली, किती सहन करायचं…
● शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी भव्य मोर्चा
रोखठोक | लहरी निसर्गामुळे खरीपांचा हंगाम नेस्तनाबुत झाला, रब्बीवर कसंतरी तग धरुन असलेला बळीराजा अखेरची घटका मोजताहेत. राज्य सरकारने दिलेली नुकसान भरपाई तोकडी तर केंद्र सरकारचे आडमुठे धोरण. किती सहन करायचं… सहनशक्ती संपलीय…! आता… “आर या पार” अशी भुमीका घेत मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शुक्रवार दि. 20 जानेवारीला भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढा उभारणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. नैसर्गीक आपत्तीत हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला सर्वप्रथम धावून जात मनसेने पिडीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यातच शासनाची मदत पोहचण्यापुर्वीच तब्ब्ल पंधराशे शेतकऱ्यांना बी- बियाण्याचे वाटप करुन सरकारलाच सणसणीत चपराक दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस व दुध उत्पादक शेतकरी संघटीत आहेत. आक्रमक आंदोलनाच्या जोरावर पाहीजे तो भाव मिळवून घेतात, आपल्या विभागात मात्र शेतकरी एकजुटीने सरकार विरोधात लढताना दिसत नाही. यामुळेच मनसेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, आपल्या उज्वल भविष्यासाठी “आर या पार” मोर्चाचे आयोजन केल्याचे उंबरकर यांनी स्पष्ट केले.
राजु उंबरकर यांनी पञ परिषद घेवून “आर या पार” मोर्चा का व कशासाठी याबाबत आपली भुमीका स्पष्ट केली. शेतकरी हितासाठी सरकार व राज्यकर्त्यांनी जे करायला हवं तेच होत नसल्याने मनसेलाच कठोर भुमीका वठवावी लागेल असं वक्तव्य केलं तर वेळप्रसंगी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा याप्रसंगी दिला.
यावेळी निवेदनातुन पिकविम्याची पूर्ण रक्कम त्वरित मिळावी, शेतीसाठी दिवसा विदयुत पुरवठा व्हावा, परिसरातील स्थापीत उद्योगात भुमीपुञांना रोजगार मिळावा, APL (एपीएल) धारक शेतकऱ्यांचे रेशन पुर्ववत सुरु करावेत अशा विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गून गोहोकार, शिवराज पेचे, धनंजय ञिंबके, लकी सोमकुंवर, शुभम पिंपळकर, आजीद शेख व महाराष्ट सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार