● बीएससी व बीकॉम अभ्यासक्रमाला मान्यता
तुषार अतकारे : येथील लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बीएससी व बीकॉम (इंग्रजी माध्यमाच्या) अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रवेशा पासून वंचीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा गेल्या अनेक वर्षापासून चालविल्या जात आहे. नर्सरी ते 12 विज्ञान पर्यंत शिक्षण दिल्या जात आहे. तसेच लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबिविल्या जाते.
दोन लहानश्या खोलीत सुरू केलेल्या शाळेचा आता चांगलाच विस्तार झाला आहे. शाळेच्या देशमुखवाडी, रवी नगर व नांदेपेरा मार्गावर प्रशस्त इमारती आहे.
बारावी नंतर पदवीचे शिक्षणाच्या प्रवेशासाठी विध्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट ने वरीष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला व तसा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडे सादर केला होता.
महाराष्ट्र शासनाचे सह सचिव द.रा.कहार यांनी दि 1 सप्टेंबर ला आदेश काढून लायन्स चॅरिटेबल ट्रस्टला बीएससी व बीकॉम या दोन अभ्यासक्रमाना मान्यता दिली आहे. त्यामुळे याच सत्रात प्रवेशाला सुरवात होणार आहे.
बीएससी व बीकॉम (इंग्रजी माध्यम) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 8999681525, 9049851616 या क्रमांका वर संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.