● बाळासाहेबांची शिवसेना कार्यकारणी जाहीर
रोखठोक |:– शिवसेना पक्षात फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पक्षश्रेष्टींनी पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांची उपजिल्हा प्रमुख तर टीकाराम खाडे यांची तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दि. 9 डिसेंबरला यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सदर नियुक्त्या केल्या आहे. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती, सुधाकर गोरे, पंचायत समिती सदस्य टिकाराम खाडे, युवा सेना शहर प्रमुख ललित लांजेवार, मनीष सुरावार, किशोर नांदेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
यवतमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात सुधाकर गोरे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख किशोर नांदेकर, तालुका संघटक टिकाराम खाडे, शहर प्रमुख ललित लांजेवार यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीने वणी विधानसभा क्षेत्रात बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाय रोवण्यास सुरवात केली आहे.
वणी: बातमीदार