Home Breaking News ऍड. कुणाल चोरडिया यांची अध्यक्षपदी वर्णी

ऍड. कुणाल चोरडिया यांची अध्यक्षपदी वर्णी

314

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीची कार्यकारणी गठीत

वणी | शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येते. भव्यदिव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवांची आतुरता वणीकर नागरिकांना असते. यावर्षी तरुणाईच्या हाती समितीची धुरा सोपविण्यात आली असून ऍड. कुणाल चोरडिया यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Img 20250422 wa0027

ऍड. कुणाल चोरडिया हे उच्च शिक्षित आहे. सामाजिक भान जपणारे उमदे नेतृत्व म्हणून ते उदयास येत आहे. शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धडाक्यात साजरी करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते, नेते विजय चोरडिया हे समितीचे अध्यक्षपद भूषवत होते.

Img 20250103 Wa0009

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून ऍड. कुणाल चोरडिया, उपाध्यक्ष मयुर गोयनका, उपाध्यक्ष हितेश गोडे, सचिव सागर जाधव, सहसचिव अमोल धानोरकर, कोषाध्यक्ष सचिन शिरसागर, सह कोषाध्यक्ष राजू रिंगोले, प्रसिध्दि प्रमुख पियुष चव्हाण, सह प्रसिध्दि प्रमुख मयुर गेडाम, कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी, सह कार्याध्यक्ष शुभम मदान यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार

 

Previous articleहतबल….तरुणाचा आधारासाठी ‘संघर्ष’
Next articleथरारक…बस चे मागील चाक निखळले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.