Home Breaking News ओबीसी जनगणनेशी संबंधीत वैचारिक मेजवानीचा लाभ

ओबीसी जनगणनेशी संबंधीत वैचारिक मेजवानीचा लाभ

संत तुकाराम महाराज जयंतीचे आयोजन
प्रा. अशोक राणा यांचे व्याख्यान

रोखठोक | संत साहित्याचे गाढे अभ्यासक, धर्म- संस्कृती व इतिहास-भाषा संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांचे व्याख्यान गुरुवार दि. 2 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता शेतकरी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी ओबीसी जनगणनेशी संबंधीत वैचारिक मेजवानीचा लाभ मिळणार आहे.

संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून आजचा शेतकरी-कष्टकरी, बहुजन (obc, vj, nt, sbc) समाज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सकल कुणबी समाज आणि OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी-मारेगाव झरी च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण देरकर तर उद्घाटक आ. प्रतिभा धानोरकर ह्या असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून संजय खाडे, प्रमुख अतिथी आशिष खुलसंगे, प्रदीप बोनगीरवार, विजय पिदूरकर, प्रमोद इंगोले हे असतील.

Img 20250103 Wa0009

“विसरू सारे सामाजिक-राजकीय भेद आणि आपल्या OBC(VJ, NT, SBC) च्या जनगणेसाठी होऊ या एक” हे ब्रीदवाक्य घेऊन वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी सर्व वणीकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल कुणबी समाज आणि obc (vj, nt, sbc) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार