Home Breaking News जड वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डयात गेला रस्ता

जड वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डयात गेला रस्ता

652

सोमवारी ग्रामस्थ करणार चक्काजाम

वणी: पुरड ते वेळाबाई यामार्गाची जड वाहनांच्या वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था व प्रशासनाचे दुर्लक्ष लक्षात घेता कुंड्रा ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी संतप्त ग्रामस्थ जड वाहनांची वाहतूक ठप्प करणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरड ते वेळाबाई यामार्गाची जड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुर्णतः चाळणी झाली आहे. स्थानिक नागरिकांना व दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अक्षरशः कवायत करावी लागते. अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला मात्र संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

पुरड ते वेळाबाई यामार्गाची अवस्था मृत्यूकुंडाप्रमाणे झाली आहे. लहानसहान अपघात नित्याचेच आहे त्यातच मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा रस्ता दुरुस्ती बाबत साकडे घातले आहे.

या मार्गावरील जड वाहनाची वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी कुड्रा ग्रामस्थांनी केली आहे. या मार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत यामुळे बस सेवाही बंद पडली आहे. यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पुरड ते वेळाबाई यामार्गाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली होती मात्र प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने सोमवार दि. 4 जुलै ला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार