● खाजगी कर्जाचा डोंगरही शिरावर
दीपक डोहणे

मारेगाव शहरातील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून व गटातील कर्जाच्या तगाद्याने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवार दि.15 सप्टेंबर ला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली.
शहाबुद्दीन शेख लाल (48) असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचेकडे चार एकर शेती असून ती भाड्याने देत आहे. मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी कायम धडपड करणाऱ्या शहाबुद्दीन यांनी मायक्रो फायनान्स कडून कर्जाची उचल केली. मात्र हप्त्याची रक्कम फेडता येणे अशक्य झाले. अशातच कंपनीचा तगादा वाढला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मागील काही दिवसांपासून विवंचनेत असतांना आज बुधवारला त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून जीवनाचा अखेर केला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.