Sad News Wani |- काँग्रेस पक्षाचे नेते संजय खाडे यांचे वडील रामचंद्र तुकाराम खाडे (84) यांचे आज दुपारी 12 वाजताचे सुमारास निधन झाले. Ramachandra Tukaram Khade (84) passed away today around 12 noon.

रामचंद्र खाडे यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. ते काँग्रेस चे नेते संजय खाडे यांचे वडील होते.
त्यांचे वर आज सायंकाळी 5 वाजता वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली जावई नातवंडे असा आप्त परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)