● मध्यरात्री ची घटना, पोलिसांची धावाधाव
वणी: येथील सराईत चोरटा ‘गब्ब्या’ ला दोन महिण्यापूर्वी तांदूळ चोरी प्रकरणात यवतमाळ कारागृहात रवाना केले होते. प्रकृती अस्वस्था मुळे त्याला शासकीत रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी ला रात्री 12 वाजताच्या दरम्यान त्याने रुग्णालयातून पलायन केल्याने पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली असून सर्व पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत.

मोहमद जावेद अब्दुल उर्फ गब्या (39) रा. मोमीनपुरा असे पसार झालेल्या अट्टल चोरट्या चे नाव आहे. त्याने 21 डिसेंबर ला शहरातील एका धान्याच्या दुकानातून तांदळाची चोरी केली होती. चोरी केलेले तांदूळ विक्री करिता वाहनातून नेत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळताच त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले होते.
गब्ब्या हा सराईत चोरटा आहे, त्याला वणी पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. कारागृहातून सुटून आल्यावर तो अल्पावधीतच पुन्हा आपल्या कार्याला अंजाम देतो. चोरी करण्याची त्यांची पद्धत पोलिसांना चांगलीच अवगत आहे. तसेच त्याने न्यायालयात आपला अविवेकीपणा सुद्धा दाखवला होता यामुळे त्याचेवर पोलिसांची करडी नजर असते.
गब्ब्या कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडली यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री गार्ड ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याची काळ्या रंगाची दुचाकी क्रमांक MH -29 -U -1167 ही घेवून त्याने धूम ठोकली. या बाबत आपआपल्या पो स्टेच्या हद्दीत शोध घेवुन CRO येथे कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वणी बातमीदार