● सुरक्षा रक्षकाला मारहाण, MSF जवानांची सतर्कता
वणी: रविवारी मध्यरात्री भंगार चोरट्याचं टोळकं घोन्सा कोळसा खाणीत दाखल झालं. तेथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा राक्षकाला मारहाण करण्यात आली. त्याच वेळी MSF जवानांचे वाहन धडकल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या घटनेत एक चोरटा हाती लागला असून सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भंगार चोरट्यांची कार्यप्रणाली परिसरातील नागरिकांना चांगलीच अवगत आहे. होत्याचं नव्हतं करण्यात माहीर असलेल्या चोरट्यांच्या रडारवर आता कोळसा खाणीतील मौल्यवान भंगार आहे. त्यात लोखंडी साहित्य, तांब्याची तार, अल्यूमिनियमची तार व महत्वपूर्ण यांत्रिक साहित्यावर चोरट्यांची नजर स्थिरावली आहे.
रविवार दि. 5 जूनला मध्यरात्री दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने वेकोलीच्या घोन्सा खाणीत शिरली. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. तर कुऱ्हाडीचे पाते गळ्यावर ठेवून धाक दाखविण्यात आला. तेवढ्यात MSF जवानांचे वाहन त्या ठिकाणी धडकले आणि भंगार चोरट्यानी पळ काढला.
सुभाष दादाजी नरांजे (36) वेकोलिचे सुरक्षा आहेत त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अटकेतील एक व फरार आरोपींवर भादंवि कलम 395, 353, 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु भंगार चोरटे पोलिसांना मिळतील मात्र त्यांचा करविता धनी नेमका कोण हे शोधण्याचे कर्तव्य पोलिसांनी पार पाडल्यास खऱ्या अर्थाने भंगार चोरीला पायबंद घालता येईल.. अन्यथा…..
वणी: बातमीदार