Home Breaking News क्रिकेटची रणधुमाळी, T-10 स्‍पर्धेची उत्‍सूकता शिगेला

क्रिकेटची रणधुमाळी, T-10 स्‍पर्धेची उत्‍सूकता शिगेला

834

मॅन ऑफ द सिरीज ला मिळणार रॉयल एनफिल्ड हंटर

वणीः येथील शासकीय मैदानावर दि. 6 ते 16 ऑक्‍टोबर दरम्‍यान दिवस व राञकालीन T-10 क्रिकेट सामन्‍याचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे. बक्षीसांची लयलुट करण्‍यात येणार असुन मॅन ऑफ द सिरीज मिळवणाऱ्या स्‍पर्धकाला रॉयल एनफिल्ड हंटर (बुलेट)दिल्‍या जाणार आहे. या स्‍पर्धेचे आयोजन पारसमल प्रेमराज ज्वेलर्सच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Img 20250422 wa0027

येथील शासकीय मैदानात शुक्रवार दि. 6 ऑक्‍टोबरला सकाळी T-10 स्‍पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे हस्‍ते होणार आहे. आयोजीत कार्यक्रमांच्‍या अघ्‍यक्षस्‍थानी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन भुतडा हे असतील तर प्रमुख अतिथी म्‍हणुन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, तारेंद्र बोर्डे, शरद जावळे, संजय पुज्जलवार यांची उपस्थिती असणार आहे.

Img 20250103 Wa0009

क्रिकेट सामन्‍यांचा ज्‍वर दिवसेंदिवस चांगलाच वाढतोय. झटपट होणारे सामने विशेष आकर्षण ठरतांना दिसत आहे. त्‍यातच क्रिडा शौकीनांत उत्‍साह व जल्‍लोश निर्माण करण्‍यासाठी शहरात वेळोवेळी विविध सामन्‍याचे आयोजन करण्‍यात येते. वणीत भव्‍यदिव्‍य स्‍वरुपात आयोजीत करण्‍यात आलेल्‍या T-10 क्रिकेटचे सामने टेनिस बॉलने खेळले जाणार आहेत. एका दिवशी 5 सामने खेळले जाणार असुन प्रत्येक मॅच ही 10 ओव्हर ची राहणार आहे.

वणीकर नागरीकांना क्रिकेट सामन्‍याची रणधुमाळी अनुभवता यावी याकरीता मैदानावर भव्य एलईडी स्क्रीन लावण्‍यात येणार आहे. तसेच महिला प्रेक्षकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सदर स्‍पर्धा आयपीएलच्या नियमानुसार खेळली जाणार आहे. स्‍पर्धेची रणधुमाळी अनुभवण्‍यासाठी वणीकर क्रीडाप्रेमींनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी: बातमीदार