● दोन अटकेत, डिबी पथकाची कारवाई
रोखठोक | रंगारीपुरा येथे क्रिकेट सामन्यावर सटटा खेळला जात असल्याची गोपनीय माहीती ठाणेदारांना मिळाली. स्थानिक गुन्हे शोध पथकाने धाडसत्र अवलंबले असता दोघांना ताब्यात घेत दिड लाखाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार दि.3 मार्चला रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

राजेश्वर सुरश चापडे (35) रा. रंगनाथ नगर व शिवा भरतभुषण शर्मा (28) रा. रंगारीपुरा असे अटकेतील सटोडीयांचे नावे आहेत. पाकिस्तान सुपरलिग सिझन क्रिकेट मालीकेमधील कराची विरूदध इस्लामाबाद या दोन संघाचा सामना सुरू होता. क्रिकेट सामान्याचे वेड तरूणाईला चांगलेच लागले आहे. सामना कोणताही असो, त्यावर सटटा खेळला जात असल्याचे वास्तव उजागर झाले आहे.
ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना गोपनीय माहीतगाराकडुन प्राप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हेशोध पथकाने (DB) रात्री रंगनाथ नगर गाठले. एका खोलीत क्रिकेट वर सट्टा खेळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. सट्टा घेत असलेल्या दोन सटोडीयांना ताब्यात घेत त्यांच्याकडुन 4 मोबाईल संच, लॅपटॉप, एलईडी टिव्ही असा एकुन 1 लाख 57 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक (SP) डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, SDPO संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हेशोध पथकाचे PSI आशिष झिमटे, सुदर्शन वानोळे, डोमाजी भादिकर, सुहास मंदावार, हरिंद्रकुमार भारती, सागर सिडाम, शुभम सोनुले, पुरषोत्तम दडमल व छाया उमरे यांनी केली.
वणी: बातमीदार