● चौघांवर गुन्हा दाखल
वणी: एक दिवशीय क्रिकेट सामन्यावर लाईव्ह सट्टा मोबाईल वरून लावण्यात येत होता. या बाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच धाडसत्र अवलंबण्यात आले असता एक लाख 29 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार दि. 22 जुलै ला रात्री करण्यात आली.

सुधीर रमेश चांदकर (40) शास्त्री नगर वणी, सलीम जमील शेख (35) भाग्यशाली नगर हे दोघे घटनास्थळी आढळून आले. तर क्रिकेट बेटींग मध्ये हारजितच्या झालेल्या पैशाचे देवाण-घेवाणाचा व्यवहार विवेक मधुकर मोडक (37) रा. पटवारी कॉलनी हा करत होता तर उतरवाडी अन्यत्र करत असल्याची कबुली आरोपीने दिली. यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहेत.
शहरातील एस बी लॉन परिसरात राहणाऱ्या दिलीप दुरुडकर यांचे घरी इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन संघात सामना सुरू होता. यावेळी क्षणाक्षणाला घडणाऱ्या बाबीवर मोबाईल च्या माध्यमातून सट्टा सुरू होता. माहितीच्या आधारावर ठाणेदारांनी सपोनि माया चाटसे व पथकाला धाड सत्र अवलंबण्याची सूचना दिली.
पोलीस पथकांनी रेड केला असता घटनास्थळावरून एक लॅपटॉप, 10 मोबाईल, एक चार्जर, दुचाकी व रोकड पाच हजार 300 रोकड असा एकूण एक लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वणी पोलिसांनी केली.
वणी: बातमीदार