Home Breaking News खरंच..’मंगेश पाचभाई’ नाम ही काफी है….!

खरंच..’मंगेश पाचभाई’ नाम ही काफी है….!

1590

विविधांगी आंदोलनातून प्रश्नांची सोडवणूक
जनसेवेसाठी अहोरात्र तत्पर

झरी-जामणी सारख्या आदिवासी बहुल, दुर्गम भागातील अडेगाव या गावातील तडफदार नेतृत्व मंगेश पाचभाई.. नाम ही काफी है….! जनसेवेसाठी अहोरात्र तत्पर, विविधांगी आंदोलनातून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कसब, रक्तदूत म्हणून मिळवलेली ख्याती, आपल्या सामाजिक कार्याने वणी परिसरात वेगळं स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मंगेश पाचभाई.

Img 20250422 wa0027

शेतकरी कुटुंबात जन्मलेला उच्च शिक्षित तरुण, सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा याकरिता सातत्याने संघर्ष करतोय. हटके आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला धारेवर धरण्याचे कसब त्याच्या अंगी आहेत. सहा डिसेंबर ला त्याचा वाढदिवस… मित्र परिवार उत्साहात वाढदिवस साजरा करतीलच मात्र आम्ही त्यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकणार आहोत.

Img 20250103 Wa0009

मंगेश ने स्वतःला वयाच्या सोळाव्या वर्षापासून जनसेवेत झोकून दिले. काळाची गरज ओळखून रक्तदान हेच जीवनदान असल्याने स्वतःची संस्था उभारून दहा हजार रुग्णांना रक्त पुरवठा केला आहे. परिसरात मंगेश ला रक्तदूत म्हणून ओळखल्या जाते. आजही ते अखंडपणे रक्तपुरवठा करतात आणि रुग्णांचा जीव वाचवत असतात.

शेतकरी कुटुंबात जन्मलेला मंगेश हा तरुण उच्चशिक्षित आहे. समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं या माध्यमातून समाजाची, दिन दुबळ्या गरिबांची, निराधारांची सेवा करतात. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून आरोग्य सेवक, समाज भूषण, गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

रक्तदानाच्या चळवळीपासून त्यांनी सामाजिक उपक्रमांनी झंझावात निर्माण केला. रुग्णांसाठी नेत्र शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच सर्वसामान्य जनता व रुग्णासाठी केलेली हटके आंदोलने कमालीची गाजली. चिखलनायक आंदोलन, एमएसईबी ची अंत्ययात्रा किंवा टाकीवर चढून शोले आंदोलन, खड्ड्यात बसून रस्ता मंजुरीसाठी केलेलं अनोखं आंदोलन प्रचंड प्रभावी ठरली.

मंगेश पाचभाई या युवा नेत्याने राजकारणात सुद्धा वेगळी छाप पाडली आहे. अडेगाव ग्रामपचायत, अडेगाव ग्राम विकास सोसायटी वर आपलं एकहाती वर्चस्व स्थापन करून आपल्यातील “राजकारणी” गुण दाखवून दिला आहे तर दिग्गजांना चित करून आपला झेंडा रोवला आहे. तरी या युवा जनसेवकाला पुढील वाटचाली करिता अनंत शुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.