Home Breaking News खासदार यांच्या पाठोपाठ आमदार सुध्दा ‘मैदानात’

खासदार यांच्या पाठोपाठ आमदार सुध्दा ‘मैदानात’

वणी : सध्या गाव खेड्यात कबड्डीचे सामने रंगताना दिसत आहे. यापूर्वी खासदार धानोरकर यांनी कबड्डी मैदानात उतरून गडी बाद केला होता. आता यामध्ये वणीचे आमदारही मागे राहिले नाही त्यांनी देखील कबड्डीच्या सामन्यात ‘रेड’ मारून आपल्यात असलेल्या खेळाडू वृत्तीचा परिचय दिला आहे.

चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर हे नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. राजकीय क्षेत्रा सोबतच त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शनही ते करत असतात. खासदार धानोरकर यांना खेळा बाबत विशेष रुची असल्याने अनेक वेळा स्पर्धेचे आयोजन देखील त्यांनी केले आहे.

आता मात्र वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे देखील मागे राहिले नाही त्यांनी देखील मैदानात उडी घेतली आहे. झरी तालुक्यातील देमाडदेवी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन आमदार बोदकुरवार यांनी केले होते.

Img 20250103 Wa0009

उद्घाटना नंतर मात्र आमदारांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी चक्क मैदानात एन्ट्री मारून आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यांनी मैदानात सुरू असलेल्या सामन्यात चक्क…रेड मारून उपस्थितांची मने जिंकली. कबड्डी सामन्यातील आमदार बोदकुरवार यांचा एन्ट्री करतांनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
वणी: