◆घोन्सा येथील घटना
घोन्सा :- घोन्सा येथील महावितरण उपकेंद्रात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय लाईनमन ने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 12 सप्टेंबर च्या सायंकाळी 6 वाजताचे सुमारास उजेडात आली आहे.

किशोर बंडू भोस्कर असे मृतकाचे नाव असून तो घोन्सा येथील महावितरण उपकेंद्रात लाईनमन या पदावर कार्यरत होता.आई वडील बाहेर गावी राहतात त्यांची पत्नी गर्भवती असल्याने माहेरी गेली होती व भाऊ सुद्धा घरी नव्हता घरी कोणी नसतांना किशोर यांनी आपल्या स्वतःच्या घरातील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली सदर घटना हि 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली घटना नागरिकांच्या लक्षात येताच मुकुटबन पोलीस स्टेशनला कळविण्यात आले घटनास्थळी पोलिस दाखल होऊन मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत्यू मागिल कारण अस्पष्ट आहे मृतक किशोर यांच्यामागे पत्नी तीन वर्षांची मुलगी आई वडील भाऊ असा परिवार आहे