Home Breaking News गावातील ऐतिहासिक वारसा करणार जतन

गावातील ऐतिहासिक वारसा करणार जतन

592

ग्रामस्थांचा ‘विश्वास’ हाच विकासाचा श्वास

रोखठोक | ब्रिटिश कालखंडापासून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कायर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गाव विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ग्राम विकासाचे हित जपणारा तगडा उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढतोय. गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामस्थांचा ‘विश्वास’ हाच विकासाचा श्वास असल्याचे मत स्पष्टपणे मांडतोय.

Img 20250422 wa0027

तालुक्यातील कायर हे गाव फार पुरातन आहे, ब्रिटिश कालखंडात या गावाला अनन्य साधारण महत्व होते. गावात ऐतिहासिक मंदिरे व किल्ला आहे या पुरातन वास्तूचे जतन करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणेच विकासात्मक धोरण निश्चित करून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे गावाच्या प्रथम नागरिकांचे कर्तव्य आहे.

Img 20250103 Wa0009

गाव विकास परिवर्तन पॅनलने राकेश विठ्ठल शंकावार यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. सोबतच गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगुन निवडणूक रिंगणात उतरलेले सदस्यगण आहेत. निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही मात्र शंकावार चा गट ग्रामस्थांची पसंती ठरताना दिसत आहे.

‘गावाचा विकास हाच ध्यास’ असणाऱ्या गाव विकास परिवर्तन पॅनलने बेघरांना घरकुल मिळवून देण्यास प्रथम प्राधान्य, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पीडितांना न्याय, स्मशानभूमीचा रस्ता आकर्षक व सोंदर्यीकरण, संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट, रोहयो अंतर्गत प्रत्येक गरजू व्यक्तीला रोजगार, सर्वांगीण वाचनालय, भूमिगत गटारे, डिजिटल अंगणवाडी अशा अनेक महत्वपूर्ण मूलभूत बाबीचा समावेश जाहीरनाम्यात केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदारांच्या भेटीगाठी व आपल्या पॅनल ची उपलब्धी तसेच विकासात्मक रणनीती मतदारांना समजावून सांगावी लागणार आहे. आजची रात्र निर्णायक असणार आहे. सरपंच व सदस्यपदाच्या उमेदवारांना दक्ष राहून मतदारांना मतदानासाठी प्रेरित करावे लागणार आहे.
वणी : बातमीदार