Home Breaking News गौराळा फाट्यावर पुन्हा अपघात, दुचाकीस्वार गंभीर

गौराळा फाट्यावर पुन्हा अपघात, दुचाकीस्वार गंभीर

रस्त्यावरील उभे ट्रक घातक

रोखठोक | गौराळा फाटा अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. एक दिवसापुर्वी उभ्या ट्रकला धडकणाऱ्या दुचकीस्वारांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात 35 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.

गणेश बापुराव गुंजेकार (35) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो आपले नित्यनियमाचे काम आटोपून वणी येथून आपल्या दुचाकी क्रमांक (MH-29-BL-7842) ने बुरांडा या गावी जात होते. गौराळा फाट्या जवळ उभा असलेला ट्रक दुचाकीस्वाराला अंधारात दिसलाच नाही. अचानक नियंत्रण बिघडले आणि भीषण धडक बसली.

या घटनेत दुचाकीस्वार हा गंभीर जंखमी झाला. ही घटना कळताच जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009
Previous articleभूषण भेदी यांचे निधन
Next articleपिकअप व ऑटोची धडक, एक ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.