● खरबडा मोहल्ला परिसरातील घटना
सुनील पाटील | शिव जयंतीच्या दिवशी शुक्रवार दि. 10 मार्चला प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा ( LCB )पथकाने घातकशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून दोन धारदार तलवारी (sharp swords) जप्त करण्यात आल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रोहीत राकेश खरे (20) व अयान मनसुरी शवकत अली (19) असे घातकशस्त्र बाळगणाऱ्याची नावे आहेत. ते रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला येथील निवासी आहेत. घातपात व दहशत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या घरात घातक शस्त्र बाळगुन असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली.
शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तडक रंगनाथ नगर परिसरात पोहोचले. संशयित रोहीत खरे याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात दोन धारदार तलवारी आढळून आल्या. तलवारी कोठून आणल्या याबाबत विचारणा केली असता त्या आयन याच्या असून त्यानेच ठेवण्यासाठी दिल्याचे स्पष्ट केले. LCB पथकाने दोघांना ताब्यात घेत तलवारी जप्त केल्या आहेत.
सदर कारवाई सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, सुनिल खंडागळे, सुधिर पिदुरकर, सुधिर पांडे, रजनिकांत मडावी, नरेश राऊत यांनी पार पाडली.
वणी: बातमीदार






