Home Breaking News घोन्सा येथील इसम पुरात वाहून गेला

घोन्सा येथील इसम पुरात वाहून गेला

देवीचा घट विसर्जना करिता विदर्भा नदीत गेलेला 50 वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना दि 16 ऑक्टोबर ला दुपारी 2 वाजताचे सुमारास घडली.

राजू श्रीहरी बोरकुटे वय 50 घोन्सा असे नदीत वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे.गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.

घोन्सा येथील राजू श्रीहरी बोरकुटे यांच्या घरी देवीच्या घटाची स्थापना करण्यात करण्यात आली होती.आज पासून देवीच्या विसर्जनाला सुरवात झाल्याने घरचा घट विसर्जन करण्यासाठी राजू गाव लगतच असलेल्या विदर्भा नदीवर गेला होता.

Img 20250103 Wa0009

नदीला पूर आला  आहे घट विसर्जित करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने राजू नदीत वाहून गेला.ही माहिती गावात कळताच गावातील काही नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही

घोन्सा – प्रविण नैताम