● फास्ट टॅग ची inquiry पडली महागात
वणी: येथील छोरीया लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेल्या 52 वर्षीय इसमाला फास्ट टॅग ची inquiry पडली महागात पडली. त्यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेतून अवघ्या काही क्षणातच ‘त्या’ भमट्याने 99 हजार 500 रुपये लंपास केले. ही घटना दि. 23 जुलै ला घडली.

बंडू तुकाराम बानकर (52) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते येथील छोरीया परिसरात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी ते आपल्या चारचाकी वाहनाने नागपूर ला जाण्यासाठी सकाळी निघालेत. टोल प्लाझा जवळ पोहचल्यावर ‘फास्ट टॅग’ चे खाते बंद असल्याचे सांगितले. तसेच Customer care वर सम्पर्क करण्याचे सुचवले.
बानकर यांनी ‘फास्ट टॅग’ ची inquiry करण्यासाठी गूगल वरून Customer care चा नंबर सर्च केला. प्राप्त क्रमांकावर कॉल केला असता त्यांना ‘फास्ट टॅग’ अपडेट केला नाही त्यामुळे तो ब्लॉक झाला आहे असे सांगितले. तसेच खात्यात एक हजार रुपये असल्याचे सुध्दा त्या भमट्याने स्पष्ट केले आणि लिंक पाठवली.
बानकर यांनी ती लिंक ओपन करताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा वणी शाखेतून 12: 35 ते 12: 49 वाजता पर्यंत पाहिले एक रुपया व नंतर 80 हजार आणि 19 हजार 500 असे एकूण 99 हजार 501 रुपये भमट्याने आपल्या खात्यात वळते केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बानकर यांनी बँकेला सूचित केले व नागपूर सायबर सेल कडे रीतसर तक्रार केली. पुढील तपास सुरू आहे मात्र ‘फास्ट टॅग’ बाबतची inquiry महागात पडली.
वणी : बातमीदार