● दीड लाखाचा ऐवज लंपास
रोखठोक : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुरड या गावात चोरट्यानी शनिवार दि.24 डिसेंबर च्या मध्यरात्री दोन घरे फोडली. या घटनेत 1 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
चोरट्यानी काही महिन्यांपूर्वी शहरातील घरे आपल्या निशाण्यावर घेतली होती. बंद घरांना टार्गेट करून आपले मनसुबे पूर्णत्वास नेत होते. वाढत्या चोऱ्यामुळे पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढविली त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसला आहे.
आता चोरट्यानी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविल्याचे दिसत आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुरड(पुनवट) या गावात दि 24 डिसेंबर च्या मध्यरात्रीला नथुजी ठाकरे व रामदास जेऊरकर यांच्या घरी मागील दारातून प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने व पैसे असा 1 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही घटना लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेण्यात आली.
शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोरांचा तपास लागावा या करिता स्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार






