● 2 लाख 33 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
तालुक्यातील मोहूरली ते विरकुंड मार्गावर दक्षिण भागातील जंगलात कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. रविवार दि. 12 डिसेंबर ला दुपारी धाडसत्र अवलंबले असता तिघांना ताब्यात घेत 2 लाख 33 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वणी तालुक्यात शेतकऱ्यांचे पीक घरी येताच कोंबड बाजाराला चांगलाच उत येतो. पैशाची आवक बऱ्यापैकी राहत असल्याने अवैध व्यावसायिक सभोवताली जंगलात कोंबड्याच्या झुंजी लावतात. यात हरजित केल्याजाते, हा जुगार झटपट रोकड कमावण्याचा असल्याने काही विशिष्ठ दिवशी लपूनछपून होतो.
मोहूरली ते विरकुंड मार्गावरील जंगलात कोंबडबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी डोबी पथकाला धाड अवलंबण्याचे आदेश दिले. दुपारी 1 ते 2:30 वाजता जंगलात सापळा रचून तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.
जगदीश गुरुचरण पाटील (38) रा. राजुर कॉलरी, विठ्ल लटारी पिंपळशेंडे (58) रा. नायगाव, विजय मधुकर फटाले (38) रा. पटवारी कॉलोनी लालगुडा असे आरोपींची नावे असून त्यांच्या जवळून 2 कोंबडे, लोखंडी कात्या, 3 दुचाकी व रोकड असा एकूण2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून पोउपनि शिवाजी टिपुर्णे, परि. पो.उप.नि. आशिष झिमटे तसेच डी.बी. पथकचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरीन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी मोल नुनेलवार यांनी केली. पुढील तपास पोउपनि शिवाजी टिपुर्णे हे करीत आहे.
वणी: बातमीदार