● प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन
रोखठोक | वसंत जिनींग सहकारी संस्थेचे मावळते अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल मातब्बर उमेदवारसह निवडणूक रिंगणात उतरले आहे. निवडणूक रंगतदार होणार असली तरी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवता यावी याकरिता प्रचार कार्यालयाचे उद्घाटन थाटात करण्यात आले.

वसंत जिनींग सहकारी संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बलाढ्य चार पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. आजी- माजी आमदार विरोधात असल्याने निवडणूक तुल्यबळ होणार आहे. परंतु मावळत्या अध्यक्षांच्या कार्यकाळात संस्थेची झालेली उन्नती सभासदांना चांगलीच अवगत आहे.
संस्थेची वार्षिक उलाढाल 3 कोटीच्या घरात असल्याने अनेक दिग्गजांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यामुळेच संस्था ताब्यात घेण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. तब्बल अकरा हजार सभासद असलेल्या संस्थेचे कार्यक्षेत्र वणी, मारेगाव, झरी या तिन तालुक्यात आहे. मुकूटबन, मारेगाव, मार्डी, शिंदोला, वणी येथे जिनींग आहे. सोबतच शहरात शेतकरी मंदीर, लाॅन च्या माध्यमातुन संस्थेने आर्थीक स्त्रोत निर्माण केले आहे.
दि. वसंत को.ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी च्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल च्या माध्यमातून विजयबाबू चोरडीया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
वणी: बातमीदार