Home Breaking News जेष्ठ पत्रकार भूषण शर्मा काळाच्या पडद्याआड

जेष्ठ पत्रकार भूषण शर्मा काळाच्या पडद्याआड

मुक्त ललकार साप्ताहिकाचे संपादक होते

वणी: जेष्ठ पत्रकार भूषण शर्मा हे मुक्त ललकार साप्ताहिकाचे संपादक होते. ते येथील जटाशंकर चौक परिसरातील निवासी असून त्यांचे गुरुवार दि. 19 मे ला निधन झाले मृत्यूसमयी ते 65 वर्षाचे होते.

Img 20250103 Wa0009

मितभाषी असलेले भूषण शर्मा यांचे शहरात अनेकांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांचे वडील दिवानचंद शर्मा यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक मुक्त ललकार ची धुरा त्यांनीच सांभाळली होती.

गुरुवारी ते कामा निमित्ताने कायर येथे जात असताना उमरी या गावात ते उतरले. तेथील मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचेवर शुक्रवारी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तस्वकीय परिवार असून एक जेष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार

( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )