Home Breaking News भीषण….ट्रकला दुचाकी धडकली,अपघातात दोघे ठार

भीषण….ट्रकला दुचाकी धडकली,अपघातात दोघे ठार

● यवतमाळ मार्गावरील घटना

1590

यवतमाळ मार्गावरील घटना

accident news : रोखठोक | यवतमाळ मार्गावरील बायपासवर उभ्या ट्रक ला दुचाकी धडकली. या घटनेत एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसरा तरुण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. ही घटना मंगळवार दि. 2 मे ला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान घडली. One died on the spot while the other youth succumbed to his injuries during treatment in the incident where the two-wheeler collided with the stationary truck.

Img 20250422 wa0027

श्रिकांत श्रीनिवास दोब्बलवार (23) हा तरूण राजूर येथील निवासी होता तर सुमित सुरेश कोमलवार (22) हा जैताई नगर मध्ये वास्तव्यास होता. असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची नावे आहेत.

Img 20250103 Wa0009

मृतक दोघे तरुण एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते दोघे दुचाकी क्रमांक MH-34- BX- 7075 ने चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. वणीला परतल्यावर ते दोघे काहीवेळ सुमित च्या घरी थांबले. त्यानंतर श्रीकांत ला राजूर येथे सोडण्यासाठी जात असताना बायपास जवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रक क्रमांक MH-31- FC- 9993 ला भरधाव दुचाकी धडकली.

अपघात भीषण होता दुचाकी चालक श्रीकांत चा घटनास्थळीच मृत्यू झाला. जमलेल्या नागरिकांनी दोघांना रुग्णालयात हलवले. सुमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर ला हलविण्यात आले मात्र पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
वणी: बातमीदार

Previous articleबालकाला जिवंत वीजतारेचा धक्का
Next articleहर्षा, राधीका व साहिल…  JEE Advance साठी पात्र
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.