● सोमनाळा फाट्याजवळील घटना
वणी | यवतमाळ मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला संट्रो कारने जबर धडक दिली. या अपघातात एक तरुण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 30 जुलै ला रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली.

अमोल वसंतराव देठे (40) असे मृतक तरुणाचे नाव आहे, तो तालुक्यातील भालर येथील रहिवाशी होता. घटनेच्या दिवशी रात्री संट्रो कार क्रमांक MH-29- N- 9331 ने तिघे वणीकडे परतत होते. सोमनाळा फाट्याजवळील उतारात रस्त्यावर ट्रक उभा होता. अचानक ट्रक समोर दिसताच कारचालक आकाश लालसरे राहणार छोरीया कॉलनी गणेशपुर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार ट्रकवर आदळली.
अपघात भीषण होता, चालकाच्या बाजूला बसलेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. जखमीतील आकाश ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. तर तेजस मडावी याची प्रकृती स्थिर असून त्याचेवर उपचार सुरू आहे.
वणी : बातमीदार