● वांजरी येथील घटना
वणी: तालुका व परिसरात आत्महत्येचे पीक आले आहे. आर्थिक विवंचनेतून आत्मघात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वांजरी येथील 32 वर्षीय तरुणाने मंगळवार दि. 27 सप्टेंबर ला दुपारी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली.
विजय नामदेव येरेकार (32) असे मृतकाचे नाव आहे तो वांजरी येथे वास्तव्यास होता. रोजमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करायचा. घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसताना त्याने स्वयंपाक घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब दुपारी उघडकीस आली.
पारिवारिक मंडळींना गळफास घेतलेल्या अवस्थेत विजय दिसताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. लगेचच पोलिसांना सूचित करण्यात आले. याप्रकरणी महादेव येरेकार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वणी: बातमीदार





