Home Breaking News त्याने….गळफास लावून संपवले जीवन

त्याने….गळफास लावून संपवले जीवन

1167

शनिवारी पहाटे उघडकीस आली घटना

रोखठोक | आपल्या परिवारासह सर्वोदय चौकात राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. ही बाब शनिवार दि. 11 मार्चला पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Img 20250422 wa0027

संतोष मारोतराव बोरूले (47) असे मृतकाचे नाव आहे. ते येथील सर्वोदय चौक परिसरात वास्तव्यास होते. रात्रीच्या काळोखात त्यांनी घराच्या छताला असलेल्या हुक मध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

Img 20250103 Wa0009

पहाटे पाच वाजताच्या दरम्यान त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी उठला. तर त्याला वडील गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. ही बाब त्याने शेजाऱ्यांना सांगितली व पोलिसांना सूचित केले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याने आपले जीवन का संपवले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
वणी : बातमीदार