● मारेगाव तालुक्यातील घटना
रोखठोक | मारेगाव तालुक्यातील मदानापूर या गावात वास्तव्यास असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी पहाटे उजागर झाली.

हरिदास बाजीराव गेडाम (55) असे मृतकाचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह मदानापूर या गावात वास्तव्यास होते. शनिवारी पारिवारिक मंडळी साखरझोपेत असताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
हरिदास गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच घरच्या मंडळींनी एकच हंबरडा फोडला. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. त्यांनी आत्मघाती पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
वणी: बातमीदार