Home Breaking News त्या…प्रकरणी पोलिसांचा तपास हत्त्येच्या दिशेने

त्या…प्रकरणी पोलिसांचा तपास हत्त्येच्या दिशेने

राजूर कॉलरीत आढळला होता मृतदेह

वणी: सोमवारी सकाळी राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली होती. घटनास्थळावरील निरीक्षण व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे पोलिसांनी हत्त्येच्या दिशेने तपास आरंभला आहे.

अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृतकाचे नाव असून तो राजूर कॉलरीतील निवासी आहे. एका चूनाभट्टी वर तो कार्यरत होता. कामगारांना वेतन वाटपाचे काम तो करायचा.

रविवारी तो दुपारपर्यंत चूनाभट्टी परिसरातच असल्याचे बोलले जाते. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच आढळला.

Img 20250103 Wa0009

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करिता पाठवले आणि आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रासा येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्या घटनेत पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून हत्त्येचा उलगडा केला होता. राजूर कॉलरी येथील घटनेत सुद्धा संशयाची स्थिती निर्माण झाली आहे.

राजूर कॉलरी येथील प्रकरणी ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली PSI  शिवाजी टिपूर्णे पुढील तपास करत आहे. या प्रकरणी घटनास्थळावरील निरीक्षण व परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेता पोलिसांनी हत्त्येच्या दिशेने तपास सुरू केला आहे. अवघ्या काही दिवसातच हत्या की अकस्मात मृत्यू याचा उलगडा होणार आहे.

वणी: बातमीदार