Home Breaking News थरारक….नरभक्षी वाघाचा धुमाकूळ, गुराखी ठार

थरारक….नरभक्षी वाघाचा धुमाकूळ, गुराखी ठार

7674

कोलार पिंपरी शिवारातील घटना

रोखठोक | तालुक्यात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नरभक्षी वाघाने कोलार पिंपरी शिवारात गुरे चरायला नेणाऱ्या गुराख्याला लक्ष केल्याने कमालीची खळबळ माजली आहे. रविवार पासून बेपत्ता असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

Img 20250422 wa0027

रामदास पिदूरकर (58) असे मृतक गुराख्याचे नवं आहे ते कोलार पिंपरी येथील रहिवासी होते. रविवार दि.27 नोव्हेंबर ला ते नेहमी प्रमाणे गुरे ढोरे चराई करिता कोलार पिंपरी शिवारात घेऊन गेले होते. परंतु ते सायंकाळी घरी परतले नाही. घरच्या मंडळींनी परिसरात शोधाशोध केली मात्र ते आढळून आले नाही.

Img 20250103 Wa0009

तालुक्यात सध्या वाघाची चर्चा जोरदार दहशत निर्माण झाली आहे. पशुधनासोबतच शेतकरी- शेतमजुरांवर हल्ला होत आहे. काही दिवसांपूर्वी ब्राम्हणी येथील युवकाला गंभीर जखमी केले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी पहाटे ग्रामस्थ व पारिवारिक मंडळींनी शोध सुरू केला असता त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस व वन विभागाला सूचित करण्यात आले असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
वणी: बातमीदार

ही बातमी सुद्धा वाचा….

https://rokhthok.com/2022/11/28/18144/